अजितदादांना आहे ‘या’ गोष्टीची भिती; दुसऱ्यांदा पवारांची भेट घेण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर

अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांनी शरद पवारांची सलग दुसऱ्या दिवशी भेट घेतली आहे. दोन गट पडलेले असतानाही सलग दुसऱ्या दिवशी पवारांची भेट घेतल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

आजची आमदारांसोबतची भेटही पूर्वनियोजित नसल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांना याबाबत काहीही कल्पना नव्हती. आमदार अचानक चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित झाले होते. हे कळाल्यानंतर शरद पवार चव्हाण सेंटरकडे गेले.

बंडखोर आमदार आणि शरद पवार यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली आहे. ते आशीर्वाद घेण्यासाठी शरद पवारांकडे आले होते, असे म्हटले जात आहे. पण असे असले तरी अजित पवारांना अपात्रतेची भिती तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अजित पवार यांच्यासोबत एकूण ३० आमदार आहे. त्यामध्ये काही आमदारांना मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यांनी शिंदे सरकारसोबत गेल्यामुळे त्यांना ही मंत्रिपदं मिळाली आहे. त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्या ९ आमदारांना अपात्र करण्याचं पत्र शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं.

शरद पवार यांच्या गटाने पत्र दिल्यामुळे अजित पवारांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्या मंत्र्यांना अपात्र करु नये, काहीतरी यावर तोडगा काढावा. ते सांगण्यासाठी ते आमदार शरद पवार यांच्याकडे आले असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, रविवारी झालेल्या भेटीत अजित पवारांच्या आमदारांनी शरद पवारांशी एक तास चर्चा केली होती. पण शरद पवारांनी त्यांच्याशी कोणतीही चर्चा केलेली नव्हती. पण त्यानंतर आपण भाजपसोबत जाणार नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले होते.