भंडाऱ्यातून एक बातमी समोर आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. याठिकाणी स्मशानघाटाकडे निघालेल्या अंत्ययात्रेत असे काही घडले की नागरिक प्रेत सोडून पळाले. तिरडी घेऊन जाणाऱ्यांनीही ती खाली ठेवून वैनगंगा नदीत उड्या मारल्या. याठिकाणी लोकांवर मधमाशांनी हल्ला केला.
यामुळे सगळेच पळू लागले. तिरडी घेऊन जाणाऱ्यांनीही ती खाली ठेवून वैनगंगा नदीत उड्या मारत मधमाशांपासून जीव वाचविला. तुमसर तालुक्याच्या सालई शिवारात ही घटना घडली. यामध्ये अनेकांना चावा देखील घेतल्याच्या बातम्या आल्या आहेत.
याठिकाणी शुभम भोयरचे निधन झाले होते. यामुळे दुपारच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. वैनगंगा नदी काठावरील स्मशानभूमीकडे गावकरी जात होते. सालई शिवारात येताच मधमाशांनी अंत्ययात्रेतील लोकांवर हल्ला केला.
यामुळे याठिकाणी असलेल्या साऱ्यांची पळापळ सुरू झाली. जवळच असलेल्या उसाच्या शेतात जाऊन काही दडले. काही धानाच्या शेतातील चिखलात तर काहींनी दुचाकीने गावाच्या दिशेने धाव घेतली. यामुळे मोठा गोंधळ उडाला.
तसेच तिरडी घेऊन असलेल्या पाच-सहा जणांचीही अडचण झाली. काय करावे हे सूचत नसल्याने त्यांनी तिरडी खाली ठेवून जवळच असलेल्या वैनगंगेच्या पात्रात उडी घेतली. काही मिनिटातच सगळेच वातावरण शांत झाले. आपापल्या परीने सगळेच पळून गेले.