रिझर्व्ह बँकेकडून राज्यातील मोठ्या बँकेवर बंदी! ग्राहकांना पैसेही काढता येणार नाहीत, खातेदारांना धक्का…

राज्यात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने राज्यातील एका मोठ्या बॅंकेवर कारवाई केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील सहकारी बँकेतून पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. यामुळे या बँकेतील खातेदारांना एकच धक्का बसला आहे.

आता या बँकेशी संबंधित ग्राहक पुढच्या सहा महिन्यांपर्यंत पैसे काढता येणार नाहीत. या बँकेला ग्राहकाला कर्ज किंवा इतर रक्कम देण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे आता येथील लोकांचे टेंशन वाढले आहे. ही बातमी समजल्यावर अनेकांची तारांबळ उडाली होती.

याबाबत माहिती अशी की, भारतीय रिझर्व्ह बँकेने शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्रवर बंदी घातली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याआधी आरबीआयने पीएमसी बँक आणि येस बँकेत पैसे काढण्यावर समान निर्बंध लादले होते.

बँकेची आर्थिक स्थिती हे कारण पुढे करत याबाबत निर्बंध लादले आहेत. बँक रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीशिवाय कोणतंही कर्ज, आगाऊ अनुदान किंवा नूतनीकरण करणार नाही. तसेच कोणीही गुंतवणूक करणार नाही, असेही बँकेकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे आता ग्राहक चिंतेत आहे. जेव्हा एखादी बँक अपयशी ठरते किंवा ती बंद केली जाते. आता सहकारी बँकांचे हजारो ठेवीदार बँकेतून ठेवी काढू शकत नसल्याने चिंतेत आहेत. आता ग्राहकांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यामुळे आता येणाऱ्या काळात या बँकेबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बँकेत अनेकांची खाती आहेत. तसेच अनेकांचे पैसे गुंतवणूक देखील आहे. आता पुढील निर्णय होईपर्यंत काही करता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.