भारताने तिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला आणि मालिका 3-0 ने जिंकली. भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये तिसरा टी-20 जिंकला. अफगाणिस्तान संघाने रोहित शर्माच्या भारतीय संघाला कडवी टक्कर दिली. यामुळे शेवटपर्यंत कोणाचा विजय होईल, सांगता येत नव्हते.
प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात 212 धावा केल्या. 213 धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 6 बाद 212 धावाच करू शकला. यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तान संघाने एका विकेटवर 16 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघालाही केवळ 16 धावा करता आल्या.
यादरम्यान रोहित ५व्या चेंडूवर मैदानातून निवृत्त झाला आणि त्याच्या जागी रिंकू सिंग फलंदाजीला आला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहित आणि रिंकूने फलंदाजी करत 2 गडी बाद 11 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाने पहिल्या तीन चेंडूंमध्ये दोन विकेट गमावल्या आणि यासह भारताने सामना जिंकला.
भारताने सामना जिंकला, मात्र दुसऱ्या षटकात रोहित शर्मा फलंदाजीला आल्यावर गोंधळ उडाला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये तो फलंदाजीला आल्याने नियमांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये रोहित स्वत: निवृत्त झाला आणि दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये तो पुन्हा फलंदाजीला आला.
ICC T20 खेळण्याच्या अटींनुसार, जर एखादा फलंदाज पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झाला तर तो त्यानंतरच्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करू शकत नाही. मात्र, रोहितच्या बाबतीत तो निवृत्त झाला की नॉटआऊट झाला हे निश्चित झालेले नाही.
आजारपण, दुखापत इत्यादी कारणांमुळे एखादा फलंदाज निवृत्त झाला तर तो फलंदाज आपला डाव पुन्हा सुरू करू शकतो. जर काही कारणास्तव असे झाले नाही तर फलंदाज निवृत्त नाबाद मानला जाईल. कोणत्याही कारणास्तव फलंदाज निवृत्त झाल्यास, तो विरोधी कर्णधाराच्या संमतीने आपला डाव पुन्हा सुरू करू शकतो.
या दोन्ही नियमांनुसार दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी रोहितची मैदानात एंट्री अफगाणचा कर्णधार इब्राहिम झद्रानच्या संमतीनेच व्हायला हवी होती.
दुसऱ्या षटकाच्या आधी अफगाणचा कर्णधार बराच वेळ अंपायरशी बोलतांनाही दिसला. यामुळे काहीवेळ सामन्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे सामन्यात नेमकं काय सुरू आहे हे कोणाला लवकर समजत नव्हते.