सध्या आयपीएलच्या मॅच सुरू झाल्या आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ, तब्बल ५ विजेतेपदे, सर्वोत्तम गोलंदाजीसाठी ओळखळा जाणारा संघ अशी मुंबई इंडियन्स ओळख. पण काल झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली. हैदराबादने ३ बाद २७७ धावा उभ्या केल्या. या खेळीत अनेक विक्रम देखील झाले. यामुळे मुंबईचे चाहते नाराज झाले.
यामुळे रोहित शर्माने गेल्या काही वर्षात मुंबईला जो मान आणि लौकिक मिळून दिला होता तो या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली धुळीस मिळाला, असेही म्हणावे लागेल. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या होती. त्यांनी बेंगळुरूने २०१३ साली केलेल्या २६३ धावांचा विक्रम मागे टाकला.
दरम्यान, क्लासेन आणि मार्कराम यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद ११६ धावांची भागिदारी केली. हैदारबाद संघाकडून झालेली ही सर्वोच्च भागिदारी ठरली. या लढतीत हैदारबादने २७७ तर मुंबईने २४६ धावा केल्या. दोन्ही संघांनी मिळून ५२३ धावसंख्या उभी केली.
आफ्रिकेचा युवा गोलंदाज क्वेना मफाकाने ४ षटकात ६६ धावा दिल्या. स्पर्धेच्या इतिहासातील तो संयुक्तीपणे तिसऱ्या क्रमांकाचा महाग गोलंदाज ठरला. या सामन्यात अनेक वेगवेगळे विक्रम घडले. दरम्यान, याआधी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेण्याची हिम्मत अगदी चेन्नई सुपर किंग्ज सारख्या संघाला कधी जमली नाही.
ज्यांच्या गोलंदाजांची धाक सामना सुरू होण्याआधी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर असते. अशा संघाविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली जाऊ शकते, चाहत्यांचा विश्वास बसणार नाही. पण ही अशक्य अशी कामगिरी सनरायझर्स हैदराबाद संघाने केली.