फासे पलटले! भाजपला मोठा धक्का, विद्यमान खासदार ठाकरेंच्या सेनेत जाणार…

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटप सुरू असून अनेकजण नाराज देखील होत आहेत. आता भाजप खासदार उन्मेष पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. त्यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली, नंतर ते मातोश्रीवर देखील गेले. ते उद्या ठाकरे गटात प्रवेश करतील, अशी माहिती आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार उन्मेष पाटलांना उमेदवारी नाकारुन भाजपने स्मिता वाघ यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे पाटील नाराज असल्याची चर्चा होती. यामुळे आता त्यांनी ठाकरे गटात जाऊन निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

दरम्यान, आधी देखील उन्मेष पाटील यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. याठिकाणी तेच उमेदवार असतील असेही सांगितले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होणार आहे.

या मतदार संघात स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने नाराज असलेले उन्मेष पाटील हे महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उन्मेष पाटील यांची भूमिका काय असणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

दरम्यान, नाराज उन्मेश पाटील पत्नीसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. उन्मेश पाटील यांच्या पत्नीला ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, याबाबत उन्मेश पाटील यांच्यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, ते आमच्या पक्षात प्रवेश करणार का नाही ते माहित नाही, पण त्यांनी वेळ मागितली आहे. मात्र ते प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.