Salim Kutta : विधानसभेत सलीम कुत्तावरून जोरदार राडा! सलीम कुत्ता आहे तरी कोण? जाणून घ्या…

Salim Kutta : सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी विधानसभेत भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी नाशिकचे ठाकरे गटाचे नेते, सुधाकर बडगुजर यांचा एक फोटो आणि व्हिडीओ दाखवत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईच्या 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला सलीम कुत्ता यांच्या पार्टीत त्यांच्या सोबत डान्स केल्याचा व्हिडीओ त्यांनी दाखवला. असे असताना सलीम कुत्ता आहे कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सलीम कुत्ता याचे खरं नाव मोहम्मद सलीम मीर शेख असं आहे. सलीम कुत्ता 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आहे. कोर्टाने सलीम कुत्ताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यामुळे या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नंतर सुप्रीम कोर्टाने 2013 साली ही शिक्षा वैध ठरवली. त्याच्यावर स्फोटात वापरलेले साहित्य पुरवल्याचा आरोप आहे. गुजरातमधून हा शस्त्रसाठा जमा करुन तो महाराष्ट्रात आणण्यात आला होता.

तसेच सलीम कुत्तावर रायगडच्या शेखाडी किनाऱ्यावर उतरवलेले RDX पुरवल्याचाही आरोप आहे. शस्त्रसाठा आणण्यात सलीम कुत्ताची भूमिका होती. तसेच डॉन टायगर मेमनसाठी सलीम कुत्ता काम करत होता. यामुळे हा व्हिडिओ अनेक गोष्टी सांगत असून याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, टायगर मेमन आणि जावेद चिकनानंच 1993 च्या बॉम्बस्फोटाचा कट रचला होता. यामुळे आता या व्हिडिओनंतर राजकीय टीका टिप्पणी सुरू झाली असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत.