Sara Tendulkar : क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर अनेकदा चर्चेत असते. सारा आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल यांच्या नात्याची अनेकदा जोरदार चर्चा होते. सोशल मीडियावर या दोघांबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत.
मात्र आता सारा तेंडुलकरने यावर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर तिच्या नावाने सुरू असलेली सर्व खाती ब्लॉक करण्याची मागणी तिने केली आहे.
सारा तेंडुलकरच्या नावाने X वर एक अकाऊंट खूप व्हायरल झाले होते. त्या खात्यावर शुभमन गिलच्या कामगिरीचे खूप कौतुक झाले. याशिवाय साराचे फोटोही त्या अकाउंटवरून शेअर केले जात होते.
त्या अकाऊंटवरील ब्लू टिकमुळे अनेक लोक हे अकाऊंट सारा तेंडुलकरचे अधिकृत खाते मानत होते. मात्र आता सारा तेंडुलकरने हे चित्र स्पष्ट केले आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करताना, तिने स्पष्ट केले की तिचे X वर खाते नाही.
साराने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ‘सोशल मीडिया हे आपले सुख, दुःख आणि दैनंदिन व्यवहार शेअर करण्यासाठी एक उत्तम जागा आहे. मात्र, त्याचा गैरवापर चिंताजनक आहे. माझी काही डीपफेक छायाचित्रे आहेत जी वास्तवापासून दूर आहेत.
सारा तेंडुलकर नावाचे X वरील खाते स्वतःला विडंबन म्हणते पण वरवर पाहता ते माझ्या नावाने लोकांची दिशाभूल करत आहे. माझे X वर खाते नाही. विश्वचषकादरम्यान सारा तेंडुलकर खूप चर्चेत होती.
तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यातील एक व्हिडिओ सारा आणि शुभमन एकत्र दिसला होता. याशिवाय विश्वचषकातील काही सामन्यांदरम्यान शुभमन आणि सारा यांच्यातील नात्याची चर्चा रंगली होती.