गतवर्षी राज्यात भीषण पाणीटंचाईचा जाणवत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याचा फटका जसा माणसाला बसतोय तसाच मुक्या जनावरांनाही बसतोय. यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये चाऱ्याअभावी गोशाळा कशा चालवायच्या, हा प्रश्न गोशाळा चालकांना पडला आहे. याठिकाणी पाण्याची परिस्थिती खूपच भयानक आहे. येथील पारुंडी गावातील पारसनाथ गोशाळा चालकांनी आपले घरातील दागिने गहाण ठेवून चारा खरेदी केला आहे.
दरम्यान, आता त्यांच्याकडे केवळ दोन दिवसच पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. त्यामुळे त्यांनी गोशाळाला चारा देण्याचे आवाहन केले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी जनावरांना जीवापाड जपले आहे. मुक्या जरांवरांची पोटं, चारा नसलेली दावणी अन् चाऱ्यासाठी वाट पाहणाऱ्या जनावरांचा हंबरडा, असं काहीसे चित्र याठिकाणी आहे.
याठिकाणी अनेकांना दुष्काळाचा सामना करावा लागतोय. डोळ्यासमोर आलेल्या दावणीत एकावेळी मिळालेलं चारा पुन्हा कधी मिळेल याची वाट या जनावरांना पहावे लागतेय. यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज आपल्याला येईल. मुक्या प्राण्यांना वाचवण्यासाठी परमेश्वर नलावडे प्रचंड प्रयत्न करत आहे.
जनावरांसाठी त्यांनी घरातील सुनेचे सोनं गहाण ठेवून जनावरांसाठी चारा विकत आणला आहे. याबाबत ते म्हणाले, चाऱ्यासाठी हंबरडा फोडणारी मुके जनावरे पाहून अंगावरील सोनं जणू जड वाटत होते. ते मनाला पटत नव्हतं, यामुळे सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आता शेतकरी आणि गोशाला चालकांना दिलासा देण्यासाठी शासकीय स्तरावर काही निर्णायक कृती केली जाणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सध्या नेते केवळ प्रचाराचा सक्रिय आहेत. मात्र शेतकऱ्यांकडे कोणाचे लक्ष नाही.