Satara news : सातारा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली होती. यामुळे खळबळ उडाली होती. साताऱ्यातील माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याने खळबळ उडाली होती. याबाबत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात ते गेले होते. संजय रामचंद्र पवार (वय ४९) आणि मनिषा संजय पवार (वय ४५) असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. यामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतात काम करत असतानाच त्यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला.
हा खून त्यांच्याच सख्ख्या चुलत भावाने केल्याचे उघडकीस आले. आरोपीच्या अवघ्या चार तासांमध्ये मुसक्या आवळण्यात आल्या. दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार (वय 35, रा. आंधळी) असे त्याचे नाव आहे
हे दाम्पत्य शिवारात पिकाला पाणी देण्यासाठी रात्री गेले होते. यावेळी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान त्याने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर, मानेवर, गळ्यावर वार करून या दाम्पत्याची निर्घृण हत्या केली आहे. सकाळी याबाबत माहिती पुढे आली.
सकाळी शेतकरी शेतात जात असताना संजय व मनिषा पवार दाम्पत्याचे रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आले. नागरिकांनी मृतदेह बघताच आंधळी गावच्या पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिली. नंतर दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले.
याप्रकरणी दहिवडी पोलिसांना काही धागेदोरे मिळाले होते. मृत दाम्पत्य आणि आरोपी दादासोचा वाद सुरु होता. संजय पवार यांच्या मुलाने एका तरुणीवर अत्याचार केल्याने याचा राग दादासो पवारच्या डोक्यात होता. तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी वारंवार तो धमकी देत होता.