आधीच २ बायका, ४ मुलं.. दुसऱ्या पत्नीलाही ५ महिन्यात केले गरोदर; प्रसिद्ध अभिनेता ५ व्यांदा होणार बाप

काही महिन्यांपूर्वीच यूट्यूबर अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी कृतिका आणि पायल मलिक यांनी मुलांना जन्म दिला होता. अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका हिने एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव झैद ठेवले. पायल मलिक अयान आणि तुबा या जुळ्या मुलांची आई झाली आहे.

अशा परिस्थितीत आता कृतिका मलिकच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची बातमी येत आहे. मुलगा झैदच्या जन्मानंतर अवघ्या काही महिन्यांतच कृतिका पुन्हा गरोदर आहे व्लॉगमध्ये, कृतिका तिच्या गरोदरपणाची बातमी अरमान आणि संपूर्ण कुटुंबासोबत शेअर करते.

दरम्यान, पायल मलिकने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पायलला कृतिकाच्या गरोदरपणाची माहिती मिळताच ती आनंदाने उड्या मारू लागली. या आनंदाच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना पायल म्हणाली,

“आणखी एक पाहुणे येणार आहे. मी ते सांभाळून घेईन, काळजी करू नका.” एवढे बोलताच पायल आनंदाने नाचू लागली. मिळालेल्या माहितीनुसार, कृतिका सध्या एक महिन्याची गरोदर आहे आणि तिची प्रसूती पुढील वर्षी मे किंवा जून महिन्यात होऊ शकते.

अरमान मलिकही त्याच्या पाचव्या मुलाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. नुकतेच अरमान, पायल आणि कृतिका यांना त्यांच्या मुलांचे नाव मुस्लिम ठेवल्यामुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते.

ट्रोल्सला उत्तर देताना कृतिका म्हणाली होती की, “सगळी नावे खूप चांगली आहेत, मग ती हिंदू नावे असोत, मुस्लिम नावे असोत, शीख नावे असोत किंवा ख्रिश्चन नावे असोत. चिकूच्या वडिलांना आवडलेली नावे आम्ही ठेवली आहेत. यामागे त्यांचा वेगळा विचार आहे. त्याला ही नावे सुरुवातीपासूनच आवडली आहे.”