मोठ्या राजकीय नेत्यावर गंभीर आरोप, महिला म्हणाली, त्याने कपडे काढले व्हिडिओ काढून 4 वर्षे…

कर्नाटकातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा नेता आणि भारतातून पळ काढलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाची एक एक कहाणी आता समोर येऊ लागली आहे. यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या एका महिलेने प्रज्ज्वलच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रज्ज्वलने सदर महिलेवर बलात्कार करत तिचे चित्रीकरण केले आणि या चित्रीकरणाचा वापर करून तिच्यावर तीन वर्ष वारंवार लैंगिक अत्याचार केले, असे म्हटले आहे. याबाबत तपास पथकासमोर पीडित महिलेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली आहे.

यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पीडित महिला जनतेची कामं घेऊन आणि विकासासाठी निधी मिळावा म्हणून आमदार आणि खासदारांच्या कार्यालयात जात असे. एका विद्यार्थीनीला वसतिगृहात प्रवेश मिळावा या कामासाठी ती प्रज्ज्वल रेवण्णाच्या कार्यालयात गेली होती.

असे असताना प्रज्ज्वलने तिच्यावर बळजबरी केली. मी प्रज्ज्वलच्या कार्यालयात गेली असताना त्याने मला पहिल्या मजल्यावर जाण्यास सांगितले. जिथे इतर महिलाही बसल्या होत्या. तळमजल्यावरील इतरांची कामे संपवून प्रज्ज्वल वर आला. याठिकाणी सगळ्यांना पाठवून दिले आणि मी एकटीच राहिली. तेव्हा त्याने मला एका खोलीत जायला सांगितले.

याठिकाणी त्याने मला ढकलून दिले. तसेच दरवाजा बंद करून कोणी आत येणार नाही याची काळजी घेतली. त्याने मला बेडवर बसायला सांगितले. जर मला राजकीयदृष्ट्या पुढे जायचे असेल तर मी सांगतो, तसे कर, असे म्हणत तिला धमकी दिली. नंतर त्याने मला कपडे काढायला सांगितली.

मी नकार दिला तसेच मदतीसाठी आरडाओरडा केला, मात्र त्याठिकाणी कोणी नव्हते. त्याने कपडे काढून मोबाइल काढून माझे चित्रीकरण सुरू केले, असा आरोप पीडित महिलेने केला. पुढे चार वर्षे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत गैरकृत्य केले, असे त्या महिलेने म्हटले आहे.