Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण? अखेर खरी माहिती आली समोर..

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी गुंड विठ्ठल शेलार आणि रामदास उर्फ वाघ्या मारणे यांच्यासह दहा जणांंना पनवेल येथून ताब्यात घेतले आहे. विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ यांच्यात याआधी चकमक पाहायला मिळाली होती.

दोघांच्या टोळीयुद्धाने अनेकदा वातावरण तापलं आहे. यामुळे विठ्ठल शेलार कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यामधील बोतरवाडीचा आहे. शेलार सुरूवातीला गणेश मारणे या टोळीमध्ये होता तोच गणेश मारणे ज्याने संदीप मोहोळला संपवले होते.

विठ्ठल शेलार याने मुळशीमधील दोघा जणांना एका दगडी खाणीत जाळून मारलं होतं. त्याने पिंट्या मारणेला संपवत आपली गँँग प्रस्थापित केली. त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर शेलारकडे भाजपने युवा मोर्चाची जबाबदारी दिली होती.

दरम्यान, विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ टोळीमध्ये अनेकदा खटके उडालेले होते. यामुळे मोहोळ याला संपवण्यासाठी विठ्ठल शेलार याने प्लॅन केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात आरोपीने पहिले सिमकार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकले आणि पहिला फोन केंद्र सरकारच्या एका संस्थेतील कर्मचारी संतोष कुरपेला केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शरद मोहोळचा गेम केला असून ही गोष्ट मास्टर माईंडला सांगा, असे फोनवर सांगितले आहे.

अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी दिली. याप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी तीन जणांना अटक केली. त्यांना न्यायालायत हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.