शिवसेना चालते तर भाजप का नको? अजितदादांच्या प्रश्नाला शरद पवारांनी दिले ‘हे’ ‘दणकेबाज’ उत्तर

अजित पवारांनी बंड पुकारत भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. त्यामुळे राज्यात दोन गट पडले आहे. एक म्हणजे शरद पवार गट तर दुसरा अजित पवार गट.

दोन्ही गटांची बुधवारी बैठक पार पडली. त्याच्याआधी दोन्ही गटांकडून मेळावे सुद्धा घेण्यात आले होते. त्या मेळाव्यांमध्ये दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर टीका केली आहे. अजित पवारांनीही शरद पवारांवर टीका केली आहे.

अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, शिवसेना चालते तर भाजप का नकोय? हा सवाल करत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांनी अजित पवारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

शिवसेनेचे हिंदुत्व ते लपवून ठेवत नाही. ते हिंदूत्व अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारे आहे. तर भाजपचे हिंदुत्व हे विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. भाजपचे हिंदुत्व हे माणसामाणसामध्ये द्वेष वाढवणारं हिदुत्व आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

मधल्या काळात शाहूंच्या कोल्हापूरमध्ये अकोला, नांदेड या सगळ्या ठिकाणी ज्या दंगली झाल्या. त्या दंगलीबाबत सर्वांना माहिती आहे. त्या दंगली कोणी घडवल्या हे सुद्धा सर्वांना माहिती आहे. जिथे आपली सत्ता नाही तिथल्या समाजात ते विद्वेष वाढवतात, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

तसेच जो समाजाती ऐक्याला तडा लावत असेल. जो जाती, धर्मांमध्ये अंतर वाढवत असेल तो राष्ट्रप्रेमी असूच शकत नाही. महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न सध्या आहेत. मुली सुरक्षित नाहीये. त्यामुळे त्यांना राज्य चालवण्याचा अधिकार नाहीये, असे म्हणत शरद पवारांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.