शरद पवार यांनी अजितदादा दिलं खास पत्र, काय आहे पत्रात? अखेर अजितदादांना केला खुलासा

अजित पवारांनी बंड करत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदारही आले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. एक अजित पवारांचा गट आहे तर दुसरा हा शरद पवारांचा गट आहे.

अशात शुक्रवारी रात्री अजित पवार हे शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकला पोहचले होते. तिथे त्यांनी प्रतिभा पवार यांची भेट घेतली. तसेच शरद पवार यांच्याशीही त्यांची चर्चा झाली. आपली भेट ही राजकीय नाही, तर कौटुंबिक भेट असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचे ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे अजित पवार त्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे सुप्रिया सुळे आणि शरद पवारही उपस्थित होते. ते शरद पवारांशीही भेटले तेव्हा त्यांनी अजित पवारांना एक पत्र दिले आहे. ते कशाबाबत होते याबद्दलही अजित पवारांनी सांगितले आहे.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना शिक्षणाबाबतचं एक पत्र दिलं आहे. तसेच एक पत्र मलाही दिले आहे. पत्र आल्यानंतर मी लगेचच अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तसेच शिक्षण विभागाबाबत माहिती घ्यायला सांगितली आहे. ते शिक्षण विभागाच्या २०२१-२२ बाबतच्या निर्णया संदर्भातील पत्र होते, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

तसेच सरकार कोणाचे आहे हे महत्वाचे नाही. आज आपला नंबर शिक्षणामध्ये सातवा आहे. त्यामुळे शिक्षणात कोणकोणत्या अडचणी येत आहे. ते आम्हाला पाहायच्या आहेत. आम्ही ३० हजार शिक्षकांची भरती करणार आहे. जिथे जागा रिक्त असतील तिथे त्या करु. तसेच पोलिस भरतीही करु, मिरीटमध्ये करु, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

दरम्यान, कौटुंबिक भेटीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, काकींचं ऑपरेशन झाल्यानंतर मला सुप्रियाचा फोन आला होता. मला दुपारीच जायचं होतं. पण कामामुळे वेळ मिळत नव्हता. रात्री वेळ मिळल्यानंतर मी तिथे गेलो. माझं अंतर्मन मला सांगत होतं एकदा भेटून आलं पाहिजे.