Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा वाद बघायला मिळत आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केल्याने शरद पवार गट देखील आक्रमक झाला आहे. आज निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होण्यापूर्वीच शरद पवार यांच्या गटाने मोठी खेळी केली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत अजित पवार यांच्या गटातील आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. यामुळे याची चर्चा सध्या रंगली आहे.
याबाबत सुनावणी ९ ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले होते. २ जुलै रोजी अजित पवार यांनी त्यांच्या ८ सहकाऱ्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
यामुळे राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. दरम्यान, शरद पवार आज निवडणूक आयोगातील सुनावणीला स्वत: उपस्थित राहणार आहेत. ही सुनावणी सुरु होण्यापूर्वीच त्यांच्या गटाकडून मोठी खेळ करण्यात आली आहे.
जयंत पाटील हे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि व्हीप म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ४१ आमदारांविरोधात निलंबनाच्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याचसोबत विधानपरिषदेतील ५ आमदारांविरोधात देखील निलंबन याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
दरम्यान, या याचिका तीन टप्प्यात सादर केल्या आहेत. सध्या शरद पवार हे दिल्लीत आहेत. यामुळे ते काय भूमिका घेणार हे लवकरच समजेल. मात्र ते या घडामोडीत सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.