राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी भाजप-शिवसेनेसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे जास्त संख्याबळ असून त्यांना मिळणारा पाठिंबाही वाढताना दिसून येत आहे.
सध्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. त्यामध्ये एक अजित पवारांचा गट आहे, तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. अजूनही काही नेते अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा विचार करत आहे. पण आता एका मतदार संघाची चांगलीच चर्चा होत आहे. तो मतदार संघ म्हणजे कऱ्हाड दक्षिण.
कऱ्हाड दक्षिण हा खरंतर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद खुप कमी आहे. अशात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद आणखी कमी झाली आहे. या मतदार संघात खुप कमी नेते राष्ट्रवादीचे आहे.
अशात याठिकाणी असलेल्या बहुतांश नेत्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याठिकाणी अजित पवार यांच्या गटाचा एकही शिलेदार नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळावर शरद पवार गेले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी दक्षिणेतील पदाधिकारी आले होते.
या मतदार संघातील आनंदराव पाटील उंडाळकर फक्त यांनीच निर्णय घेतलेला नाही. पण राजेश वाठाकर, अविनाश मोहिते, यांच्यासह अनेक नेते हे शरद पवारांच्या गटात आहे. त्यामुळे दक्षिण कऱ्हाडमध्ये अजित पवारांचा एकही नेता नसल्याची चर्चा आहे.
सध्या या मतदार संघाची धुरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सांभाळत आहे. या मतदार संघात विलासराव उंडाळकर, यशवंतराव मोहिते या जेष्ठ नेत्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. ते शरद पवारांसाठी महत्वाचे नेते ठरणार आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राज्यभरात बदल झाले, पण त्याचा दक्षिण कऱ्हाडवर जास्त परिणाम झाला नाही.
दक्षिणेत तालुका, शहराध्यक्षापासून विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारीही शरद पवार यांच्या गटात आहे. त्यामुळे कऱ्हाड दक्षिण हा एकमेव मतदार संघ आहे, जिथे अजित पवारांचा एकही पदाधिकारी नाही. पण राजेश वाठारकर यांचे अजित पवारांसोबत चांगले संबंंध आहे. त्यामुळे ते अजित पवार यांच्या गटात जाण्याची शक्यता आहे.