अजितदादांना धक्का देत राष्ट्रवादीतील महत्त्वाचा गट शरद पवारांकडे वळाला? रोहित पवारांनी टाकला डाव

उल्हासनगर शहरात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. येथील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले कलानी कुटुंब गेल्या पाच वर्षांपासून सत्ता आणि संरक्षणासाठी सत्ताधाऱ्यांच्या गटात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नंतर वर्षभरापूर्वी कलानी कुटुंब पुन्हा राष्ट्रवादीत आले. असे असताना राष्ट्रवादीतील फुटीनंतर कलानी गटाने तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र पप्पू कलानींचे शरद पवारांसोबत असलेले जुने संबंध बघता ते पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या कलानी महलात होणाऱ्या भेटी आणि त्यानंतर नुकतीच रोहित पवार यांनी पप्पू कलानी यांची घेतलेली भेट बघता अनेक समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पप्पू उर्फ सुरेश कलानी हे कारागृहातून पॅरोलवर बाहेर आहेत. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या निष्ठावंताना डावलत कलानी कुटुंबाला भेट देत कलानी गटाला पुन्हा राष्ट्रवादीत स्वगृही आणण्याचे प्रयत्न केले. रोहित पवार देखील यासाठी गेले.

गेल्या काही दिवसात कलानी गट हा जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्या संपर्कात आहे. पप्पू उर्फ सुरेश कलानी यांचे शरद पवारांशी जुने सबंध आहेत. गणेशोत्सवाचे निमित्त साधत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी कलानी कुटुंबाच्या निवासस्थानी भेट देत सुरेश कलानी यांची भेट घेतली.

दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शहरातील एका गटाने अजित पवारांना पाठिंबा दर्शवला होता. तर काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यामुळे कलानी गटाने तटस्थ भूमिका घेतली होती.