तिला शिकायचं होतं पण तो म्हणाला संसार नीट कर, रागाच्या भरात पतीने शाळेत जाणाऱ्या पत्नीला संपवलं…

जिंतूर तालुक्यातील बोरी येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. बोरीतील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या जयश्री विश्वनाथ वाव्हळ (१६) या मुलीची तिच्याच पतीने धारदार शस्त्राने वार करत हत्या केली आहे.

संभाजीनगरमध्ये राहाणार जयश्री वव्हळ हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी भूम येथील राहणार रोहित गायकवाड याच्याशी झाला होता. जयश्रीला शिक्षणाची आवड असल्याने ती माहेरी बोरी येथे येऊन एका शाळेत नववीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. मात्र नवऱ्याला ही गोष्ट पटत नव्हती.

असे असताना सकाळी सात वाजेच्या सुमारास जयश्री वाव्हळ ही शाळेत जाण्यासाठी निघाली. यावेळी रस्त्याने एकटी जात असताना पाठीमागून पती रोहित गायकवाड याने धारदार शस्त्राने जयश्रीवर वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.

त्याने तिच्या मानेवर व चेहऱ्यावर सपासप वार केले. यात जयश्री रक्ताच्या थारोळ्यात पडली. घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिचे निधन झाले होते. यामुळे तिच्या कुटूंबाला एकच धक्का बसला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे जमादार कृष्णा शहाणे, सय्यद गयासोद्दीन यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आराेपी स्वत: पोलिस ठाण्यात घटनेनंतर रोहित गायकवाड हा पोलिस ठाण्यात हजर झाला.

यावेळी अनेकदा सांगूनही पत्नी जयश्री ही आपल्या सोबत राहायला तयार होत नसल्याने आपण रागाच्या भरात आपण तिचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शिक्षणाला देखील त्याचा विरोध असल्याचे सांगितले जात आहे.