शिंदे सरकारला निवडणूक आयोगाचा दणका! आयोगाचा मोठा निर्णय, जाणून घ्या…

निवडणूक आयोगाने राज्यातील शिंदे सरकारला मोठा धक्का दिला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या बदलीसंदर्भात निवडणूक आयोगाने राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे सरकारला दणका दिला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांना 3 वर्षांच्या निकष लावू नये, अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती. राज्य सरकारची याचिका आयोगाने मंगळवारी फेटाळली आहे. आता चहल यांच्याबरोबरच अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या सरकारला कराव्या लागणार आहेत.

याबाबत निवडणूक आयोगाकडून गेल्या आठवड्यांमध्येच ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ पदावर असणाऱ्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या कराव्यात, असा आदेश देण्यात आला होता. मात्र याबाबत काही कारवाही करण्यात आली नव्हती.

दरम्यान, आता निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे चहल यांच्याबरोबरच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्याच लागतील. थेट निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग नसल्याने आयुक्त तसेच उपायुक्तांना आदेशातून वगळावे, अशी विनंती सरकारकडून करण्यात आली होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

याबाबत एक पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने निवडणूक आयोगाला पाठवले होते. पण हे पत्र आयोगाने फेटाळून लावले आहे. यामुळे शिंदे सरकारला मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता याबाबत सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.

दरम्यान, आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता राज्य सरकारला चहल, भिडे यांच्याबरोबरच वेलासारू, पुणे येथील आयुक्तांसहीत अधिकाऱ्यांची बदली करावीच लागणार आहे. याबाबत लवकरच माहिती पुढे येईल.