साताऱ्यात शिरुर पॅटर्न? उदयनराजेंना अजितदादांची ऑफर, राजे थेट दिल्लीत…

राज्यात लोकसभेसाठी भाजपने २० जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. २८ जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. यातील १० जागांवर तिढा कायम आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता सातारा लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला आहे.

यामुळे ही जागा कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी भाजपकडून उदयनराजे भोसले लढण्यास उत्सुक आहेत. पण सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार आहे. यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने साताऱ्यावर दावा केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीने उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्याची तयारी देखील दर्शवली. पण उदयनराजे यासाठी अनुकूल नसल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रस्ताव उदयनराजे भोसले यांनी फेटाळला आहे. यामुळे याठिकाणी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

निवडणूक लढेन तर कमळ चिन्हावरच अशी ठाम भूमिका त्यांना घेतली आहे. यासाठी ते देखील देखील गेले असल्याची माहिती आहे. यामुळे ते अमित शहा यांची देखील भेट घेतील असेही सांगितले जाते. या भेटीनंतर पुढील माहिती समजेल. सध्या जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे.

यामुळे शिरूरसारखी परिस्थिती साताऱ्यात झाली आहे. मागील निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. यामुळे याठिकाणी देखील मोठा पेच निर्माण झाला आहे.

पण इथे राष्ट्रवादीचा खासदार असल्याने ही जागा अजित पवारांच्या पक्षाकडे आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी लढवेल, आणि शिवाजीराव आढळराव पाटीलच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असेही सांगितले जात आहे. यामुळे आता या दोन्ही जागेंकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.