मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉम्युला आला समोर; राष्ट्रवादीची पुन्हा हवा, तर शिंदे गटाला मोठा धक्का

अजित पवारांनी बंड करत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासोबतच्या आमदारांनाही ८ मंत्रिपदे मिळाली आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का होता.

गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडण्यात आला होता. शिवसेनेसोबतच भाजपचे आमदारही या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहत होते. पण अचानक अजित पवारांनी सरकारमध्ये एंट्री घेतली आणि त्यांनी आपल्या गटाला ९ मंत्रिपदे मिळवून दिली.

अजित पवार यांच्या येण्यामुळे शिवसेनेचे आमदार नाराज आहेत. कारण त्यांची काही मंत्रिपदे यामध्ये गेली आहे. असे असतानाच आता शिवसेनेच्या आमदारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

पावसाळी अधिवेशनानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्या विस्तारात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शिवसेनेची आणखी मंत्रिपदे राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यंदा जास्त राज्यमंत्री असणार आहे. यावेळी किमान सहा राज्यमंत्री असणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात सध्या २९ मंत्री आहेत. त्यामध्ये भाजप आणि शिंदेंचे प्रत्येकी १० तर राष्ट्रवादीचे ९ मंत्री आहेत. राज्यात एकूण ४३ मंत्री निवडले जाऊ शकतात. त्यामुळे अजुनही १४ मंत्रिपदे रिक्त आहे.

आता १४ मंत्रिपद वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. या १४ मंत्रिपदामध्ये भाजपला सात, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन-तीन मंत्रिपदे दिली जाणार आहे. पावसाळी अधिवेशनानंतर हा विस्तार होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केले होते. त्यात अनेक आमदार असे होते, ज्यांना मंत्रिपद आपल्याला मिळेल असे वाटत होते. पण अजूनही त्यांना मंत्रिपद मिळालेले नसल्यामुळे ते नाराज आहे. पण आता आपल्याला मिळणारी तीन मंत्रिपदेही राष्ट्रवादीकडे जाणार असल्यामुळे ही नाराजी आणखी वाढू शकते.