शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये मंत्रिपदावरुन तुफान हाणामारी; मुख्यमंत्री शिंदे दौरा सोडून तत्काळ..

अजित पवारांनी भाजप-शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. पण अजित पवार सत्तेत आल्यामुळे शिंदे गट मात्र नाराज असल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळाल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असून दोन आमदारांमध्ये तर बाचाबाची आणि वाद झाल्याची माहितीही समोर आली आहे.

आमदार सध्या अस्वस्थ आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर दौरा रद्द करत वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलावली होती. पण आमदार वाद घालत असल्यामुळे त्यांनी तो दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होते.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल आणि आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा शिंदे गटातील काही आमदार बाळगून होते. पण अचानक राष्ट्रवादीही सत्तेत आली. इतकेच नाहीतर त्यांच्या काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. त्यामुळे मंत्रिपदे कमी होणार आणि संधी जाणार यामुळे काही आमदार प्रचंड नाराज झाले.

शिंदे गटाला आणखी ३-४ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता होती. पण आता सत्तेत राष्ट्रवादीही आली आहे. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. आपल्याला मंत्रिपद मिळायला हवे अशी इच्छा असणाऱ्या आमदारांमध्येही आता स्पर्धा निर्माण झाली आहे. काहींनी तर ज्यांना मंत्रिपद मिळाली होती त्यांना हटवून आता आम्हाला मंत्री करा अशीही मागणी केली आहे.

अशातच शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही आमदारांमध्ये मंत्रिपदावरुन बाचाबाची झाली आहे. तसेच हा वाद इतका टोकाला गेला की त्यांच्यात आणामारी झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दौरा अर्ध्यावर सोडूनच परतावे लागले आहे. यावेळी वर्षावर झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आमदारांची समजूत काढली आहे.