सूनेची वृद्ध सासऱ्याला काठीने भयंकर मारहाण, काळजाचा थरकाप उडवणारा CCTV व्हिडीओ आला समोर

मंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी सून आणि सासऱ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेने ८७ वर्षीय सासऱ्याला काठीने मारहाण केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याठिकाणी आपल्याच वृद्ध सासऱ्यांना ही महिला अमानुषपणे मारहाण करत आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली आहे. सासू आणि सूनेचं नातं हे बाप-लेकीसारखं असतं, मात्र हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे.

ही घटना कंकनडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुळशेकर येथे घडली. तिचा नवरा नवरा हा कामानिमित्त दुबईत असतो. मात्र घरी परिस्थिती काय आहे हे त्याला समजले देखील नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अत्याचाराची ही घटना कैद झाली आहे.

ही महिला आपल्या सासऱ्याला काठीने मारत आहे आणि नंतर त्याला धक्का देत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळुरू पोलिसांनी उमाशंकरी नावाच्या महिलेला अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमवारी कनकनडी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की, उमाशंकरी नावाच्या महिलेने तिचे सासरे पद्मनाभ सुवर्णा यांना कुलशेखर परिसरात काठीने मारहाण केली आहे. यामुळे याबाबत तपास केला असता सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली.

दरम्यान, महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले तेथून तिला कारागृहात पाठवण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वृद्ध सासऱ्यांना काठीने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आणि छळ केल्याचा आरोप महिलेवर केला आहे.

यानंतर आरोपी महिलेवर आयपीसी कलम ३२४ आणि ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास सुरू कारवाई करण्यात आली असून सुनेला शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.