पुणे हिट अँड रन प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर, प्रकरणात थेट छोटा राजनचे नाव…

पुणे कार अपघातात रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेत दोघांचे जीव गेले आहेत. आता एक नवीन माहिती समोर आली आहे. अग्रवाल कुटुंबीयांना पोलिसांचा वरदहस्त हा काही नवा नसल्याचे समोर आले आहे. तसेच अग्रवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे. वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण आता चांगलेच तापलं आहे.

या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांची छोटा राजनसोबत संबंध असल्याचे उघड झाले आहे. याबाबत पोलीस तपासात भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात वेदांत अग्रवालच्या आजोबांनी छोटा राजनची मदत घेतली होती, असे पुढे आले आहे.

या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यामध्ये मोक्का लावणं अपेक्षित असनाताही पुणे पोलीसांनी केवळ साधी कलमं लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, आरोपत्रही दाखल करेपर्यंत विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक झाली नव्हती. यामुळे अनेकांनी संशय आणि संताप व्यक्त केला होता. वेदांत अग्रवालची हमी देण्यासाठी आलेल्या त्याच्या आजोबांचे, सुरेंद्र अग्रवालांचे संबंध हे थेट छोटा राजनशी असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयकडे हस्तक्षेप करण्यात आली होती. त्यामध्ये या प्रकरणाचा समावेश आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरेंद्र अग्रवाल यांनी छोटा राजनचा हस्तक असलेल्या विजय तांबट याची बँकॉक येथे जाऊन भेट घेतली होती.

भावासाोबत असलेल्या संपत्तीच्या वादात राजनने आपल्याला मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. नंतर अजय भोसले या व्यक्तीच्या खुनाच्या प्रयत्नात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.