Solapur Accident: साईदर्शनाला जाताना वाटेतच आयुष्याचा शेवट, भयंकर अपघातात चार भाविकांचा मृत्यू…

Solapur Accident : सोलापूर मधून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील करमाळा तालुक्यातील पांडे गावाजवळ फिसरे रस्त्याला कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तसेच यामध्ये करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण दगावला आहे. शिर्डी येथील साईंच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातातील मृत भाविक हे कर्नाटक राज्यातील असल्याचे माहिती समोर आली आहे. श्रीशैल चंदेशा कुंभार, शशिकला श्रीशैल कुंभार आणि ज्योती दिपक हिरेमठ यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच शारदा दिपक हिरेमठ यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. पोलीस याबाबत तपास करत आहेत.

सोलापुरातील करमाळा येथे हा भीषण अपघात घडला. सुदैवाने या अपघातात ८ महिन्यांचे बाळ सुदैवाने बचावले आहे. कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाविक साईच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र वाटेतच हे विपरीत घडले आहे. यामुळे कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.

करमाळा तालुक्यातील सालसेकडून तवेरा गाडीने शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते. कंटेनर हा फरशी घेऊन करमाळ्याकडून सालसेच्या दिशेने निघाला होता. यांच्यात हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर काही युवकांनी मोठी मदत केली.

पहाटे पावने सहा ते सहाच्या सुमारास पांडे गावच्या पुलाजवळील वळणावर या गाड्यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये वाहनांचा चुराडा झाला आहे. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. या अपघाताचा जोरात आवाज झाला. अपघाताचा आवाज येताच पांडे गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन चारचाकी बाजूला करून जखमींना बाहेर काढले.

या युवकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण करून मदतकार्य सुरू ठेवले. यामुळे जखमींना लगेच उपचार मिळाले. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अजून काही माहिती समोर आली नाही. पोलीस तपास सुरू आहे.