Solapur Crime : उद्या लग्न अन् काही तास अगोदरच मुलीने संपवले आयुष्य, महाराष्ट्राला हादरवणारं कारण आलं समोर…

Solapur Crime : सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी लग्नाला काही तास उरलेले असतानाच एका उच्चशिक्षीत तरुणीने टोकाचं पाऊल उचलंत आत्महत्या केली आहे. काही तरुणीने ब्लॅकमेल केल्याच्या त्रासामुळे तरुणाने हा निर्णय घेतला.

यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी तीन दिवसांपूर्वीच तक्रार देण्यात आली होती. मात्र त्यानंतर विवाहाच्या दिवशीच तरुणीने आत्महत्या केली आहे. यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

परिसरातील काही युवक ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप या तरुणीने केला होता. याबाबत शहरातील विजापूर नाका पोलीस स्टेशनला 15 डिसेंबर रोजी तक्रारीचा अर्ज देखील दाखल करण्यात आला होता. मात्र यावर कारवाई झाली नाही.

येथील ओम नमः शिवाय नगर, कुमठे रोड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. संबंधिक युवकांकडून तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला धमकीचे फोन आणि मेसेज देखील पाठवले होते.
मृत तरुणीचे फोटो अश्लिलरित्या एडिट करून संबधित युवकांनी ते होणाऱ्या नवऱ्याला पाठवले होते.

यामुळे ही मुलगी तणावात होती. अखेर तिने आत्महत्या केली आहे. घरी हळदीचा कार्यक्रम देखील पार पडला होता. मात्र अश्लिल फोटो व्हायरल करण्याच्या भीतीने तरुणीने पहाटेच्या सुमारास विवाहाआधीच आत्महत्या केली आहे. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला.

दरम्यान, सलमान शेख, वसीम शेख , समीर शेख यांच्यासह इतर 2 – 3 जणांनी मिळून माझ्या मुलीचा आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.