अजूनही आम्ही भेटतो, आणि त्यानंतर…!! पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्याचे धक्कादायक वक्तव्य

अभिनेते अनंत जोग हे एक लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठी तसेच हिंदी मध्येही लोकप्रियता मिळवली. गेल्या अनेक वर्षांपासून अनंत जोग सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. ते वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. यामुळे याची बरीच चर्चा होत असते.

जोग कुटुंब हे सिनेसृष्टीत कार्यरत आहे. अनंत जोग यांची बायको अभिनेत्री उज्ज्वला जोग आणि त्याची लेक क्षिती जोग हे सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. क्षितीने ही सिनेसृष्टीत ओळख निर्माण केला आहे. सध्या अनंत जोग यांची लेक क्षिती हिने सध्या निर्मितीक्षेत्रातही वळाली आहे. क्षिती अठरा वर्षांची असतानाच अनंत जोग व उज्ज्वला जोग यांनी घटस्फोट घेतला.

याची अनेक कारणे समोर आली. दरम्यान त्यांनी एका युट्युब चॅनेलला अनंत जोग यांनी मुलाखत दिली. ते म्हणाले की, जरी आमचा घटस्फोट झाला असला तरीही आमचं नातं हे मैत्रीपूर्व आहे. तिने कधी बोंबलाचं कालवण केलं की ती मला फोन करुन जेवायला बोलवते. आमचा संवाद होतो.

कधी मला बोंबलाचं कालवण खावं वाटलं की, मी तिला फोन करुन सांगतो. आणि त्यावेळी बाजारात जर बोंबील मिळाले तर ती नक्की करते. पण आजही आम्ही फोनवर बोलतो. कधी-कधी भेटायला जातो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ठ केले आहे. यामुळे घटस्फोट घेतला असला तरी आमचा संवाद भेटन होतं असेही ती म्हणाली.

अनंत जोग लेक क्षितीबाबत म्हणाले की तिने मला तिच्या दोन तीन सिनेमात कामही दिले, पण त्याचे पैसे नाही दिले, मग काय उपयोग. मुलगी असली म्हणून काय झालं, मला दोन वेळेला जेवायला लागतचं की, असा मिश्किल अनुभव त्यांनी यावेळी सांगितला.

दरम्यान, त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले आहेत. या मुलाखतीत त्यांनी आयुष्यातील अनेक वेगवेगळे अनुभव सांगितले आहेत. यामुळे या मुलाखतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.