अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे, तर दुसरा गट अजित पवारांचा आहे. अजित पवार सत्तेत गेल्यामुळे अनेक आमदार त्यांच्यासोबत गेले आहे.
छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते गेल्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. काही आमदार अजूनही अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहे. असे असतानाच शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
वर्ध्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादीत फुट पडली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबतच्या पन्नास मुख्य पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहे.
आपल्याला विकास करायचा आहे. त्यामुळे आपण अजित पवार यांच्यासोबत जात असल्याचे सुबोध मोहिते यांनी म्हटले आहे. सुबोध मोहिते हे राष्ट्रवादीतील महत्वाचे नेते होते. पण त्यांनीही राजीनामा दिल्यामुळे शरद पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
मोहिते यांच्यासोबत जवळपास ५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे अजूनही काही पदाधिकारी राजीनामे देऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण असे असले तरी वर्धा जिल्ह्यातील जे मूळ राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहे, तर शरद पवारांची साथ सोडणार नसल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार पुन्हा पक्षबांधणीला लागले आहे. ते सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. नुकतीच त्यांनी छगन भुजबळांच्या मतदार संघात सभा घेतली होती. त्यासभेत त्यांनी भुजबळांसह प्रफुल्ल पटेल आणि अजित पवारांनाही सुनावले होते.