नवऱ्याचे अचानक निधन, बायकोला अनुकंपाखाली नोकरी मिळाली, ऑर्डर घेऊन येत असतानाच घडलं भयंकर, परिसरात खळबळ

Kolhapur News : कोल्हापूरमधून एक दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी पतीच्या निधनानंतर अनुकंपाखाली नोकरी मिळाली आणि ऑर्डर घेऊन घरी येत असतानाच अपघात होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना घडली आहे.

ही घटना पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर केदारगावजवळ घडली. जयश्री या टेम्पोखाली सापडल्याने जागीच ठार झाल्या. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दुचाकीस्वार नेताजी शिवाजी कांबळे अपघातात जखमी झाले. टेम्पो व दुचाकीमध्ये हा अपघात झाला आहे.

दुचाकीवरील जयश्री दीपक नाईक (हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मृत जयश्री यांचे पती पाटबंधारे विभागामध्ये नोकरीस होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. नंतर त्यांनी संघर्ष करून अनुकंपाखाली नोकरी मिळवली.

याच नोकरीच्या ऑर्डर आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळीच हा अपघात झाला. केदारगावमधून कोल्हापूरकडे जाणाऱ्या टेम्पोने दुचाकी धडक दिली. धडक दिल्याने जयश्री रस्त्यावर कोसळल्यानंतर त्यांच्या अंगावरून टेम्पो गेला. यामुळे क्षणात होत्याच नव्हतं झालं.

यामध्ये त्या जागीच ठार झाल्या. दुचाकीस्वार नेताजी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मात्र कुटूंबाला एकच धक्का बसला आहे.

दरम्यान, राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर रोड अपघात होत आहेत. यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. सध्या चालता बोलता अपघात होत आहेत. यावर कसलीही यंत्रणा उभी नाही. तेवढ्यापुरते कारवाई होती नंतर मात्र सगळं सुरूच राहत.