ठाकरे गटाच्यावतीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर द्यावा असे म्हटलेले होते.
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित असून त्यांना लवकर निर्णय देण्याचे निर्देश द्यावे असे त्या याचिकेत होते. आता यासंदर्भात १४ जूलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अडीच महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी झाली होती. त्यामध्ये त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी याबाबत निर्णय द्यावा, असे निर्देश दिले होते. पण राहूल नार्वेकरांनी अजूनही त्यावर निर्णय दिलेला नाही.
राहूल नार्वेकर निर्णय देत नसल्यामुळे ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यानंतर राहूल नार्वेकरांनी शनिवारी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांच्या आमदारांना आपले म्हणणे मांडण्याबाबत सांगितले होते.
आता याप्रकरणी १४ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये काय होणार? कोणाच्या बाजूने हा निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ठाकरे गटाकडून हा निकाल लागून एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचे ठाकरे गटातील नेते म्हणताना दिसून येत आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांना हा निर्णय १० ऑगस्टपूर्वी घ्यावा लागणार आहे. कारण १० ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला ९० दिवस पूर्ण होणार आहे. जर तसे झाले नाही, तर ठाकरे गटाकडून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाऊ शकते.