१६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकरच लागणार, न्यायालयाने नार्वेकरांना दिले ‘हे’ आदेश

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिवसेनेच्या आमदारांना नोटीस पाठवली होती. त्यामध्ये आमदारांना त्यांचे म्हणणे सात दिवसांमध्ये लेखी स्वरुपात मांडायचे आहे. त्यामुळे १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभु यांनीही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राहूल नार्वेकरांना याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे, असे ठाकरेंनी मांडलेल्या याचिकेत म्हटलेले होते. आता त्यावरही न्यायालयाने सुनावणी केली आहे.

शुक्रवारी यासंदर्भात सुनावणी पार पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष राहूल नार्वेकरांना दोन आठवड्यांच्या आत याप्रकरणाचा निर्णय देण्याचे निर्देश दिले आहे. तसेच नोटीस पाठवत १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कोणती प्रक्रिया सुरु आहे याची विचारणाही केली आहे.

आता दोन आठवड्यांमध्ये राहूल नार्वेकरांना आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यावेळी बाजू मांडताना राहूल नार्वेकर काय सांगणार आहे याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाला वेग आल्याने लवकरच याबाबत अंतिम निकाल येईल असे म्हटले जात आहे.

राहूल नार्वेकरांनी आमदारांना सात दिवसांची मुदत दिली होती. त्यामध्ये सात दिवसांमध्ये आमदारांना म्हणणे मांडायचे आहे. पण शिंदे गटातील आमदार यावर नाराज झालेले असून आपण निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात मुदत वाढवून घेऊ, असे म्हणताना दिसत आहे.

शिंदेंच्या आमदारांच्या या प्रतिक्रियेवर आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशावर राहूल नार्वेकर काय करतात? आता ते पाहणे गरजेचे असणार आहे. १६ आमदारांना जर अपात्र ठरवण्यात आले तर आमदारांचे मंत्रिपदही जाऊ शकते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यामध्ये नाव असल्याने त्यांनाही पद सोडावे लागू शकते.