नवऱ्याचे भयंकर कृत्य! बायकोच्या गळ्यावर वार केले अन् नंतर…; पुण्यातील धक्कादायक घटना

दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे. दररोज अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत तपास सुरू आहे. ही घटना शनिवारी ता.१७) खून करून पती लाॅजला कुलूप लावून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर काही वेळातच ही घटना उघडकीस आली आहे. काजल कृष्णा कदम असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

कृष्णा कदम असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काजल आणि कृष्णा मजुरीचे काम करीत होते. दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. मात्र, दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचा विचार केला होता. याबाबत त्यांचं बोलणं झालं होतं.

या संदर्भात चर्चा करण्यासाठी ते शनिवारी दुपारी भारती विद्यापीठ परिसरातील अश्विनी लाॅजमध्ये गेले. दोघांनी तेथे मद्यपान केले. नशेमध्ये असताना दोघांमध्ये वाद झाला. कृष्णाने काजलच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केला. या घटनेनंतर खोलीला कुलूप लावून तो फरार झाला.

काही वेळाने त्याने मित्राला पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. मित्राने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लॉजमध्ये जाऊन खोलीचे कुलूप तोडले असता काजल मृत अवस्थेत आढळून आली. यामुळे सगळेच हादरले. पोलिसांनी कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा सगळा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी माहिती दिली आहे. याबाबत पोलीस तपास करत असून घरच्यांशी बोलून चौकशी सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अशाच पद्धतीने गुन्हेगारी वाढली आहे.