ब्रेकिंग! उल्हासनगरमधील सेंच्युरी कंपनीत भयानक घटना, 5 कामगारांचा जागीच अंत, अनेकजण जखमी…

ठाणे जिल्ह्यातून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील उल्हासनगर शहाड परिसरात असलेल्या सेंच्युरी रेयॉन कंपनीतील CS2 डिपार्टमेंटमध्ये जोरदार ब्लास्ट झाला. यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

या घटनेत 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आहे. तसेच अनेक कामगार जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा ब्लास्ट इतका भीषण होता की आजूबाजूच्या चार ते पाच परिसरातील घरांना हादरे बसल्याची स्थानिकांनी माहिती दिली.

याठिकाणी बाहेरील व्यक्तीला आतमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे अधिकृत माहिती समोर येत नाही. दरम्यान, या कंपनीमध्ये जो स्फोट झाला तो कशामुळे झाला याची अजून स्पष्ट माहिती समोर आली नाही.

सध्या पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या या स्फोटाचा तपास केला जात आहे. या घटनेत मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन याठिकाणी दाखल झाले आहे.

दरम्यान, मीडियाला देखील कंपनीत जाण्यापासून रोखण्यात आले आहे. याबाबत स्थानिकांनी माहिती दिली आहे. यामध्ये कामगारांचा तपास केला जात असून चौकशी सुरू आहे. याबाबत अजून माहिती समोर येईल.