भयानक घटना! पितापुत्रासह चौघांना गोळ्या झाडून संपवलं, राज्यात उद्रेक…

Manipur Violence: मणिपूरमध्ये जातीय हिंसाचारात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या घटनांमध्ये पिता-पुत्रासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. बिष्णुपूर जिल्ह्यातील बिष्णुपूर पोलीस ठाण्यांतर्गत निंगथौखॉंग खा खुनौ येथे गुरुवारी दुपारी चार वाजता पिता-पुत्रासह तिघांची सशस्त्र लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली.

ओईनम बामोंजाओ, त्यांचा मुलगा ओइनम मनिटोम्बा आणि थियम सोमेन अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व निंगथौखॉन्ग खा कुनौ येथील रहिवासी होते. इतर सहा जण जखमी झाले आहेत. या हत्येनंतर राज्याच्या दक्षिणेकडील निंगथौखॉंग मार्केटमध्ये तणाव निर्माण झाला होता.

बुधवारी रात्री 11 च्या सुमारास इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कांगचुप येथे झालेल्या हल्ल्यात ठार झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे तिघे जण राज्य सरकारच्या निंगथौखॉंग पाणी पुरवठा योजनेच्या मिनी पाण्याच्या टाकीतून पाणी आणत असताना, सुमारे पाच अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी तिघांना थांबवले आणि जवळून गोळ्या झाडल्या.

गुन्हा केल्यानंतर मारेकरी चुराचंदपूर जिल्ह्याच्या हद्दीतील जवळच्या टेकडीकडे पळून जाण्यात यशस्वी झाले. लोकांनी विरोध केला मृत गावकऱ्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी इम्फाळ येथील रिम्स रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. या हत्येनंतर राज्याच्या दक्षिणेकडील निंगथौखॉंग मार्केटमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

न्यायाच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने लोकांनी, ज्यात बहुतांश महिला होत्या, आंदोलन केले. दरम्यान, या तिघांच्या हत्येविरोधात संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात येत आहे. बुधवारपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये दोन पोलीस कमांडोसह सात जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यापासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार थांबत नाहीये. राज्यात आतापर्यंत 180 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकांचे जीव यामध्ये सध्या जात आहेत.