Thane news : दिरासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीसह तिघांना संपवल, घटनेने राज्यात खळबळ…

Thane news : ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी तिहेरी हत्याकांड झाले आहे. पतीने क्रिकेटच्या बॅट डोक्यात घालून आधी पत्नीला संपवले. त्यानंतर दोन लहान मुलांचाही जीव घेतला आहे.

ही धक्कादायक घटना कासारवडवली येथे घडली. याबाबत माहिती अशी की, आरोपी अमित धर्मवीर बागडी हा काही दिवसांपासून तो भाऊ विकास याच्याकडे राहत होता. 29 वर्षीय अमित याने बायको आणि दोन मुलांना क्रिकेटच्या बॅटने संपवले आहे.

पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हत्येनंतर आरोपी अमित हा पळून गेलेला आहे. तो तीन ते चार दिवसांपासून ठाण्यात भावाकडे राहत होता. अमित बागडी याला दारुचे व्यसन होते. यातूनच त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, अमित बागडी याने पत्नी भावना हिला आधी संपवले. त्यानंतर सहा वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांच्या मुलालाही संपवले. विकास धर्मवीर बागडी हा आरोपीचा सख्खा भाऊ असून तो ठाण्यात साईनगर कासारवडवली येथे 2 वर्षे राहिला होता.

मयत व्यक्ती भावना ही सख्या लहान दिरासोबत वास्तव्यास राहत होती. घटना घडली त्या ठिकाणी दोन मुलांचे सोबत राहत होती. गेले तीन दिवसापासून आरोपी मयत व्यक्ती हिचा पती आणि दोन मुले यांना भेटण्यासाठी म्हणून घरी आला होता.

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे ठाण्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस याबाबत तपास करत आहेत. घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.