Israel-Palestine War : इस्राईल – पॅलेस्टाईन युद्धात भारतातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं अख्ख कुटूंबच संपलं; सर्वांची निर्घृण हत्या

Israel-Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरूच आहे. आता दोन्ही बाजूंनी शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सामान्य नागरिकांव्यतिरिक्त परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. याआधी बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा अडकल्याच्या बातम्या आल्या होत्या.

मात्र, ती आता सुखरूप परतली आहे. पण ‘नागिन’ अभिनेत्री मधुरा नाईकने तिच्या कुटुंबातील दोन सदस्य गमावले आहेत. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे.

अभिनेत्रीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की, “इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात तिची बहीण आणि मेहुणे मरण पावले आहेत. अभिनेत्रीने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मी मधुरा नायक ही भारतीय वंशाची ज्यू महिला आहे.

आम्ही भारतात 3000 उरले आहोत. 7 ऑक्टोबरच्या एक दिवस आधी आमच्या कुटुंबाने एक मुलगी आणि मुलगा गमावला. माझा चुलत बहिण ओदया आणि तिचा नवरा त्यांच्या दोन मुलांसमोर निर्घृणपणे मारले गेले.

मी आणि माझे कुटुंब ज्या दु:खातून जात आहोत ते शब्दात व्यक्त करणे फार कठीण आहे. आज इस्रायल दुखात आहे, लहान मुले, महिला आणि वृद्ध हमासच्या आगीत जळत आहेत.

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मुले, महिला आणि वृद्ध लोक हमासच्या आगीत जळत आहेत. या सर्वांना टार्गेट केले जात आहे. काल मी माझी बहीण, तिचा नवरा आणि त्यांच्या लाडक्या मुलांचा फोटो शेअर केला. जेणेकरून जगाला आपले दुःख समजेल.

पण पॅलेस्टाईनचा अपप्रचार कसा चालवला जातो हे पाहून मला धक्का बसला आहे. मी ज्यू असल्यामुळे मला लाज वाटली, अपमानित आणि लक्ष्य केले गेले. मला माझे दुःख माझ्या प्रियजनांसोबत शेअर करायचे होते.

अभिनेत्री पुढे म्हणाली की, मला माझे अनुयायी, मित्र, माझ्यावर प्रेम करणारे आणि मला पाठिंबा देणार्‍या लोकांना सांगायचे आहे, ज्यांनी माझ्यावर फक्त प्रेम केले आणि ज्यांनी इतकी वर्षे माझी प्रशंसा केली.

हा पॅलेस्टाईन समर्थक प्रचार इस्रायलच्या लोकांविरुद्ध आहे. त्यांना मारेकरी म्हणून दाखवायचे आहे. हे योग्य नाही. स्वतःचा बचाव करणे म्हणजे दहशतवाद नाही. आणि मला सांगायचे आहे की मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही.”