पतीने स्वतःच्या पत्नीलाच झाडाला बांधले अन् निर्दयीपणे दगडाने ठेचून ठार मारले; लावले ‘हे’ गंभीर आरोप

पाकिस्तानचे लोक आजही त्या काळात जगत आहेत जेव्हा प्रेम करण्याची शिक्षा दगडाने मारून हत्या करण्याची होती. अशीच एक घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पती आणि कुटुंबीयांनी एका महिलेवर गैरवर्तनाचा आरोप करत तिची दगडफेक करून हत्या केली.

पोलिसांनी रविवारी या घटनेची माहिती दिली. लाहोरपासून 500 किमी अंतरावर असलेल्या राजनपूर जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खून झालेल्या महिलेचे वय सुमारे 20 वर्षे आहे. पतीने तिच्यावर दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर असल्याचा आरोप केला होता.

शुक्रवारी पती आणि त्याच्या दोन भावांनी महिलेला बेदम मारहाण केली. तिचा अमानुष छळ केला. यानंतर महिलेला झाडाला बांधून तिचा श्वास थांबेपर्यंत दगडाने वार केले. महिलेची हत्या करून आरोपी फरार झाला. ते पंजाब आणि बलुचिस्तानच्या सीमावर्ती भागात लपले असावेत, असा पोलिसांना संशय आहे.

ही महिला राजनपूर येथील अल्कानी जमातीची होती. विशेष म्हणजे सन्मानाच्या नावाखाली महिलेची हत्या होण्याची ही पहिलीच घटना नाही. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे एक हजार महिलांची सन्मानाच्या नावाखाली हत्या केली जाते.

अशा खुनामागे अनेकदा कुटुंबीयांचा हात असतो. पीडितांनी स्वतःच्या इच्छेने लग्न करून किंवा अफेअर करून त्यांच्या कुटुंबियांना लाज आणि अपमान आणल्याचं म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी पंजाबमधील मियांवली जिल्ह्यात एका तरुण महिला डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय डॉक्टरला तिच्या सहकाऱ्याशी लग्न करायचे होते, पण तिच्या वडिलांना ते मान्य नव्हते. वडील मियांवली शहरातील महिलेच्या दवाखान्यात आले होते. लग्नाबाबत त्यांनी मुलीशी वाद घातला. यादरम्यान त्याने बंदूक काढून मुलीवर गोळी झाडली. गंभीर जखमी महिला डॉक्टरला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही.