एका पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. नालासोपारा येथील आचोळे पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकावर एका वकिल महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस तपास करत आहेत. जानेवारी 2020 पासून हा सहाय्यक पोलीस निरीक्षक विविध ठिकाणी नेवून, बलात्कार करत असल्याचे तक्रारीत पीडितेने म्हटले आहे. यामुळे ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, त्यांनीच अशी घटना केल्याने चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, ही महिला व्यवसायाने वकिल आहे. आरोपीने पीडितेला मारण्याची धमकी देत तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ नवऱ्याला पाठवेल, यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. धमकी देऊन पीडित महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला असल्याचा आरोप आहे.
मल्हार धनराज थोरात असे आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षकाच नाव आहे. आरोपीने पीडितेवर कारमध्ये, विविध लॉज, हॉटेलमध्ये बलात्कार केला असल्याचा आरोप आहे. आरोपी हा पीडितेबरोबर जबरदस्ती अनैसर्गिक दुष्कृत्य करत असल्याचे म्हटले आहे.
याबाबत तक्रार दाखल झाल्यापासून आरोपी मल्हार थोरात हा फरार आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा देखील खराब होत आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
पोलीस सध्या या घटनेचा कसून तपास करत आहेत. ही महिला वकील असून ती इतक्या दिवस का गप्प होती याबाबत देखील पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामुळे यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.