गजानन महाराज प्रकटल्याचा दावा करणाऱ्या बहुरूप्याचे सत्य आले समोर; वाचून धक्का बसेल…

बुलढाणा येथील खामगावमध्ये सुटालपुरा भागात संत गजानन महाराज मंदिर परिसरात एक व्यक्ती हुबेहूब श्री संत गजानन महाराज यांच्या वेशभूषेमध्ये अचानक प्रकट झाल्याने याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबतची माहिती सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.

आता या व्यक्तीची माहिती समोर आली आहे. हा व्यक्ती लातूर जिल्ह्याचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. हा व्यक्ती लातूर जिल्हा बँकेचा खातेधारक आहे. व्यक्तीचे नाव रामराव शेषराव बिराजदार आहे. बिराजदार नावााच्या व्यक्तीचे खाते हे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहे.

यामुळे ही माहिती समोर आली आहे. हा व्यक्ती दोन दिवसापूर्वी शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जवळा बुद्रुक या गावात नागरिकांनी पकडले होते. हा व्यक्ती स्वतःमध्ये संत गजानन महाराजांचा वास असल्याचा आभास गावागावातील नागरिकांना करून देत आहे.

गजानन महाराजांच्या वेशभूषेतील व्यक्तीने परिसरातील सातव नामक व्यक्तीकडे मला भोजन करायला द्या, अशी मागणी केली. त्यांना या व्यक्तीने जेवण देखील दिले. या व्यक्तीला शेजारच्यांनी सातव यांच्याकडे जेवताना बघितले.

त्यामुळे सातव यांच्या घरात गजानन महाराज प्रगटले, असे त्यांना वाटले. यामुळे ही बातमी बाहेर पसरली. यामुळे त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकं का येत आहेत हे देखील कोणाला समजत नव्हते. शेवटी पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.

दरम्यान, धनंजय वाजपेयी नामक व्यक्तीने या गजानन महाराज यांच्या वेशभूषेतील व्यक्तीला शेगाव येथे सोडून दिल्याची माहिती समोर आली. सध्या पोलिस तपास सुरू आहे. पोलीस अजून माहिती घेत आहेत.