Imran Khan : आमिर खानचा पुतण्या बॉलीवूड अभिनेता इम्रान खान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. अलीकडे इम्रान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत होता. त्याची माजी पत्नी अवंतिकासोबतचा त्याचा घटस्फोट चर्चेत होता.
घटस्फोटानंतर इम्रान खानच्या आयुष्यात या खास व्यक्तीने प्रवेश केला मात्र घटस्फोटानंतर आता इम्रानच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. काल रात्री कीर्ती खरबंदा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत इम्रान खान दिसला होता.
यावेळी तो एकटा नसून एका खास व्यक्तीसोबत स्पॉट झाला होता. इम्रान खान येथे त्याची असलेली गर्लफ्रेंड साऊथ अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनसोबत स्पॉट झाला होता. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत.
या दोघांनी ‘मटरू की बिजली का मन डोला’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. काल रात्री दोघांना एकत्र पाहिल्यानंतर आता त्यांचे नाते पक्के झाल्याचे मानले जात आहे. लेखा वॉशिंग्टनचे लग्न झाले आहे.
तर इम्रानने 2011 मध्ये अवंतिकाशी लग्न केले आणि 2019 मध्ये दोघे वेगळे झाले. या दोघांनाही एक मुलगी आहे, तिचे नाव इमारा आहे. इमारा तिची आई अवंतिकासोबत राहते.
इम्रान खानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, ‘जाने तू या जाने’ या पहिल्या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांमध्ये स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. पण या चित्रपटानंतर इम्रान खानने अनेक फ्लॉप चित्रपट दिले, त्यानंतर तो मोठ्या पडद्यावरून गायब झाला.