गोळीबाराचा थरार!! माजी महापौरांवर अज्ञातांनी झाडल्या तीन गोळ्या, घटनेने उडाली खळबळ….

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. असे असताना आता नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये रविवारी मध्यरात्री गोळीबाराचा थरार रंगला. मालेगाव शहराच्या माजी महापौरांवर गोळीबार करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारात माजी महापौर आणि एएमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा गंभीर जखमी झाले आहेत.

यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. एएमआयएमचेचे मालेगाव महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर रविवारी मध्यरात्री तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते फरार झाले. या हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

मलिक यांच्यावर हल्ल्याची घटना रविवारी मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान घटना घडली. अब्दुल मलिक रात्री एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. एएमआयएच्या कार्यकर्त्यांपर्यंत ही बातमी गेल्यानंतर मध्यरात्री मोठा जमाव जमा झाला.

शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून नियंत्रणात आहे. मालेगाव शहरात मोठ्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरोपींना सकाळपर्यंत अटक करण्याची मागणी एएमआयएमकडून करण्यात आली. याबाबत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मालेगावात गुंडाराज सुरू असल्याची टीका मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी पथके रवाना केली आहेत. या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.