नशीबाने मारली पलटी! अब्जाधीशाची संपत्ती आली शून्यावर, वर्षभरातच सर्व बिघडलं, नेमकं काय झालं?

आपल्या देशात अनेक लोक करोडपती आहेत. श्रीमंतांच्या यादीत त्यांची नावे देखील आहेत. आपण बघतो की, अब्जाधीशांच्या यादीत अनेकांना सामील होताना आपण पाहिले आहे. पण अनेकजण श्रीमंत असून देखील काही दिवसांमध्येच खूपच गरीब होतात. असच एका व्यक्तीसोबत घडलं आहे.

या व्यक्तीची संपत्ती १७,५४५ कोटी रुपयांवरून शून्यावर आली आहे. एडटेक कंपनी बायजूजचे संस्थापक बायजू रवींद्रनचा वर्षभरापूर्वीपर्यंत श्रीमंतांच्या यादीत समावेश होता. दीर्घकाळापासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बायजूच्या अडचणी कमी होण्याची चिन्हेच दिसत नाही.

अनेक कर्मचाऱ्यांचे पगार देखील रखडले आहेत. तसेच फोर्ब्सच्या नव्या अब्जाधीशांच्या यादीत बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांची एकूण संपत्ती शून्य झाली आहे. यामुळे त्यांचे एक असे उदाहरण आहे की, काही दिवसांमध्येच त्यांचे पैसे हे संपले आहेत.

वर्षभरापूर्वी देशातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. बायजूचे सीईओ रवींद्रन यांची एकूण संपत्ती वर्षभरापूर्वी २.१ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे १७,५४५ कोटी रुपये होती. मात्र २०२४ मध्ये रवींद्रन यांची एकूण संपत्ती शून्य असल्याचे दिसत आहे.

अब्जाधीशांच्या यादीतून बायजू रवींद्रनच्या वगळल्यानंतर फोर्ब्सने सांगितले की, यावेळी केवळ चार लोकांनाच लिस्टमधून वगळण्यात आले आहे ज्यात माजी एडटेक स्टार बायजू रवींद्रन यांचा समावेश आहे. यामुळे हे कसे झाले याबाबत अनेकांना मोठा प्रश्न पडला आहे.

तसेच ब्लॅकरॉकने कंपनीचे मूल्यांकन मागील वर्षीच्या २२ अब्ज डॉलरवरून फक्त १ अब्ज डॉलरपर्यंत कमी केले आहे. यामुळे याची एक चर्चा सुरू झाली आहे. अशी अनेक उदाहरण आहेत, की क्षणात कोरोडो रुपये हे जाऊन अनेकांना गोरिबीत जगण्याची वेळ देखील येते.