---Advertisement---

पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या कुरुळकरांबाबत धक्कादायक खुलासा; महिलांना बाथरुममध्ये…

---Advertisement---

गेल्या काही दिवसांपासून डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर चर्चेत आहे. त्यांच्यावर अनेक आरोप होत आहे. त्यांनी पाकिस्तानी एजंट झारा दासगुप्ताला अग्नी, ब्रम्होस आणि रुस्तम मिसाईल संबंधित गुप्त माहिती दिल्याचे समोर आले होते.

तसेच कुरुळकर यांचे व्हॉट्सऍप चॅट्स देखील समोर आले होते. कुरुळकर यांनी पाकिस्तानी एजंटला भारताची अशी माहिती दिल्यामुळे आधीच खळबळ उडाली आहे. असे असतानाच आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

कुरुळकर यांनी महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कुरुळकर हे सध्या पुणे एटीएसच्या ताब्यात आहे.

प्रदीप कुरुळकर यांच्याविरोधात पोलिसांनी १८३७ पानांची चार्जशीट दाखल केली आहे. तसेच ती न्यायालयात देखील सादर केली आहे. प्रदीप कुरुळकर यांनी आतापर्यंत जे जे गुन्हे केले आहेत, त्या सर्वांची नोंद या चार्जशीटमध्ये आहे.

प्रदीप कुरुळकर यांनी पाकिस्तानी एजंटला भारताच्या प्रोजेक्ट्सबद्दल माहिती दिल्यामुळे आधीच खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत होते. पण आता त्यांनी दोन महिलांचे लैेगिक शोषण केल्याचेही समोर आले आहे.

दोन महिलांनी कुरुळकर यांच्यावर नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. कुरुळकर यांनी डीआरडीओच्या बाथरुममध्येच लैंगिक शोषण केल्याचे त्या महिलांनी म्हटले आहे. दरम्यान, पुणे एटीएसने कारवाई केल्यापासून अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. आता आणखीण काही खुलासे होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---