राजकारण

उद्धव ठाकरेंना धक्का! बड्या नेत्याने साथ सोडली, शिंदेंकडे जाऊन आता थेट लोकसभा लढवणार…

सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अनेकजण पक्षांतर देखील करत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंसोबत असलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत.

सध्या शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी ठाकरे गटाकडून निश्चित मानली जात आहे. त्यांच्या विरोधात शिंदे गट भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिर्डी लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गेल्या तीन निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. यामुळे ठाकरे गट याठिकाणी जोरदार ताकद लावणार आहे. याठिकाणी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आहेत. ते शिंदेकडे आहेत.

भाऊसाहेब कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आता भाऊसाहेब वाकचौरे विरूद्ध भाऊसाहेब कांबळे अशी लढत होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे अंतिम निर्णय काय होणार हे लवकरच समजेल.

दरम्यान, मनसे जर महायुतीत सहभागी झाली तर शिर्डीतून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. मात्र मनसे अजून महायुतीमध्ये सहभागी होणार की नाही यावर शिक्कामोर्तब झाले नाही. यावर चर्चा सुरू आहे.

तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही शिर्डीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे दिवसागणिक शिर्डी लोकसभेच्या जागेची चर्चा जोर धरत असून नेमकी जागा कुणाला मिळणार? यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील आहेत.

Related Articles

Back to top button