शिंदेगटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव जाणार? ठाकरे गटाने केली मोठी खेळी

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन एक वर्ष उलटून गेले आहे. तसेच या एका वर्षात शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि नावही मिळाले आहे. पण असे असले तरी उद्धव ठाकरे गटाकडून ते चिन्ह आणि धाव मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी एक याचिका दाखल केली असून त्यामध्ये निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सोमवारी ३१ जूलैला यासंदर्भात सुनावणी होणार आहे.

शिंदे गटाने बंड केल्यानंतर धनुष्यबाण या चिन्हावर आणि शिवसेना या नावावर दावा केला होता. उद्धव ठाकरे यांनीही या चिन्ह आणि नावावर दावा केला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात बोलताना निवडणूक आयोग याचा निर्णय घेईल असे म्हटले होते.

निवडणूक आयोगाने यावर निर्णय देताना सुरुवातीला धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठावले होते. पण त्यानंतर त्यांनी संख्याबळानुसार एकनाथ शिंदे यांच्या गटाला नाव आणि चिन्ह दिले होते. पण आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आयोगाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.

विधीमंडळातील पक्ष फुटला म्हणजे खरा पक्ष फुटला असे होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा बेकायदेशीर आहे. आयोगाने चिन्ह आदेशाच्या परिच्छेद १५ अन्वयेचा गैरवापर केला आहे, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड करत विधीमंडळातील पक्ष फोडला आहे त्यांनी पक्षाविरोधी कारवाया केल्या आहे. त्यांच्यासोबत १५ आमदारही यामध्ये सामील होते. त्यांना अपात्र ठरवण्याकडेही निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केल्याचे ठाकरे गटाने याचिकेत म्हटले आहे.