केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मोठी घोषणा, राजकारणात खळबळ, नेमकं काय म्हणाले नारायण राणे?

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यामुळे याठिकाणी या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी नारायण राणे निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते, मात्र पक्षाने याबाबत आदेश दिला असल्याची चर्चा सुरू आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात राजकीय वातावरण बिघडलं आहे. नवीन चिन्ह पक्षाचे दोन गट फोडाफोडी असे अनेक प्रकार घडले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. शिंदे यांच्या शिवसेनेनेही दावा सांगितल्यामुळे या जागेवर चुरस पाहायला मिळाली.

केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंना २०१४ आणि २०१५ अशा लागोपाठ दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. यामुळे त्यांची ताकद कमी झाली असल्याचे सांगितले जाते. यामुळे आता ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची निवडणूक आहे. त्यांनी आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले आहे.

याबाबत राणे म्हणाले की, भाजपने आपल्याला उभं राहण्यास भाग पाडलं, पण पक्षासाठी आपण जबाबदारी पूर्णपणे पार पाडत आहोत आणि विजयाची खात्री आहे. माझी ही शेवटची निवडणूक असेल आता थांबण्याची वेळ आली आहे. असे म्हणत त्यांनी मतदारांना काहीसं भावनिक केल्याचे दिसून येते.

दरम्यान, राणे म्हणाले, मी वयाच्या १५ व्या वर्षापासून राजकारणात आहे. मला अनेक पदे मिळाली आहेत. माझी दोन्ही मुले राजकारणात आहेत. मला वाटते की आता मी आराम केला पाहिजे आणि माझ्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, यामुळे आता पुढे निवडणूक लढवणार नाही.

दरम्यान, नारायण राणे यांनी आता काहीही करून ही निवडणूक जिंकायची असा पण केला आहे. ते राज्यसभेची इच्छुक होते, मात्र पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली नाही. यामुळे त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरावे लागले. आता कोण बाजी मारणार हे लवकरच समजेल.