Pune Crime: पुण्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर अनैसर्गिक बलात्कार; आरोपीने पिस्तूल कानाला लावले अन्..

Pune Crime : लग्नाचा बहाणा दाखवून मराठी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला सोलापूर मधून अटक केली आहे. याप्रकरणी 32 वर्षीय अभिनेत्रीने विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सोलापूरचा रहिवासी आरोपी विराज रविकांत पाटील (वय-35 वर्षे, रा. रॉयल पाम, सोरेगाव, सोलापूर) याच्यावर बलात्कार आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कर्नाटकच्या माजी आमदाराचा मुलगा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने काही मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हे चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचे आहेत. फेसबुकच्या माध्यमातून आरोपी आणि तक्रारदार यांची ओळख झाली. फिर्यादीने आरोपीला सांगितले होते की, ती विवाहित आहे, पण पतीसोबत राहत नाही. यावर आरोपीने पीडितेला वचन दिले होते की, तो त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करेल.

शिवाजीनगर न्यायालयात आपला घटस्फोटाचा खटला सुरू असल्याचेही आरोपीने पीडितेला सांगितले. पीडितेने त्याच्यावर विश्वास ठेवला. तिच्या विश्वासाचा फायदा घेत आरोपी तिला भेटण्यासाठी पुण्यात आला आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

यानंतर त्याने पीडितेला देवदर्शन पाहण्याच्या बहाण्याने उज्जैनला नेले आणि तेथेही तिच्यावर बलात्कार केला. पण लग्नाची वेळ आली तेव्हा तो नाही होऊन पडला. त्यानंतर त्याने पीडितेचे फोन घेणेही बंद केले. जेव्हा आरोपीने पीडितेचे फोन घेणे बंद केले तेव्हा ती स्वतः त्याला भेटायला गेली.

तो तिचे कॉल का घेत नाही?तो माझ्या कुटुंबाला का भेटला नाही? आणि बोलला नाही असे तिने विचारले. यावर विराजने रागाच्या भरात पीडितेच्या डोक्यात पिस्तुल रोखून ‘मी तुझ्याशी लग्न करणार नाही, तू पोलिसात गेलीस तर मी कोण आहे ते दाखवून देईन’, अशी धमकी दिली. यानंतर तिला ढकलून दिले. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.