क्राईम

तरुण तरुणीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, चालू गाडीत करत होते नको त्या गोष्टी, मांडीवर बसून…

चालू कारमध्ये प्रेमी युगुलाच्या अश्लील चाळ्याचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ नागपूरचा असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी प्रेमी युगुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत सूरज राजकुमार सोनी व त्याची प्रेयसी, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सूरज हा सोमवारी सायंकाळी कारने लॉ कॉलेज चौकात आली. काही वेळात त्याची प्रेयसीही मोपेडने तेथे आली. त्यांच्यात आधी चर्चा झाली.

नंतर तिने लॉ कॉलेज परिसरात मोपेड पार्क केली. ती कारमध्ये बसली. दोघेही कारने काही अंतरावर असलेल्या नाश्त्याच्या स्टॉलवर गेले. त्याठिकाणी थोडावेळ थांबल्यावर ते पुन्हा एकदा गाडीत बसून निघून गेले. नंतर धावत्या गाडीत तरुणी कार चालक सूरजच्या समोर बसली.

त्यानंतर दोघेही धावत्या कारमध्ये अश्लील चाळे करायला लागले. एका मोटारसायकल चालकाने हे चाळे मोबाइलमध्ये कैद केले. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. गाडी सुरू असताना या गोष्टी करणे किती योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या क्रमांकाच्या कार चालकाचा शोध सुरू केला. पोलिसांनी कार चालक व त्याच्या प्रेयसीची ओळख पटवली. नंतर याबाबत गुन्हा दाखल केला आहे. एका मोटारसायकल चालकाने हे चाळे मोबाइलमध्ये कैद केले. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

दरम्यान, चौकशीनंतर पोलिसांनी सूरज व त्याच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल केला. जामिनावर त्यांची सुटका केली. ही कार सूरजच्या वडिलाच्या नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी याबाबत चौकशी करून त्यांना नोटीस दिले, नंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button