शरद पवारांना मोठा धक्का, विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसने ‘या’ नेत्याची केली निवड

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. अजित पवारांसोबत मोठ्या प्रमाणात आमदार गेल्यामुळे शरद पवारांसोबत खुप कमी आमदार राहिलेले आहे. त्यामुळे आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

आधी अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते. पण त्यांच्या बंडानंतर जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेते म्हणून निवडण्यात आले. अशात शरद पवार यांच्या गटाची संख्या कमी झाल्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते पदही गमवावे लागले आहे.

विरोधी पक्षनेते पदासाठी आता काँग्रेसचा नेता असणार आहे. कित्येक वर्षानंतर पुन्हा काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळाले आहे. काही दिवसांपासून काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार अशी चर्चा होती. पण नक्की कोणता नेता होणार याबाबत स्पष्ट करण्यात आले नव्हते. पण आता ते स्पष्ट झाले आहे.

भविष्यात तो नेता भाजपकडे जाणार नाही, अशा नावाचा शोध काँग्रेस घेत होती. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण ही नावे चर्चेत होती. पण त्यांच्या ऐवजी विजय वड्डेटीवार यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसने विजय वड्डेटीवार यांची निवड केली आहे. त्यामुळे विधीमंडळाची जबाबदारी बाळासाहेब थोरातांकडेच राहणार आहे. बाळासाहेब थोरातांनाच हा निर्णय दिल्ली हायकमांडने कळवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून यावर खुप चर्चा होत होती. कोणाला विरोधी पक्षनेते पद मिळाले याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अशात काँग्रेस पक्षातील काही नेते हे भाजपमध्ये येतील असेही दावे भाजपकडून केले जात होते. त्यामुळे भाजपकडे जाणार नाही अशा नेत्याच्या शोधात काँग्रेस होती.